फ्री वाय-फाय मंत्रालयाच्या दारीच बंद!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वायफायमय करण्याची घोषणा केली होती. पहिल्या फेजमध्ये 500 ठिकाणी वाय-फाय तर 1 मे 2017 पर्यंत 1200 ठिकाणी फ्री वाय-फाय सुरु होतील असं मुंबईकरांना आश्वासन दिलं होतं. पण यातील काही ठिकाणी जाऊन जेव्हा एबीपी माझानं पडताळणी केली त्यावेळी वाय-फाय सुविधा उपलब्धच नसल्याचं आढळून आलं.

फ्री वाय-फाय मंत्रालयाच्या दारीच बंद!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वायफायमय करण्याची घोषणा केली होती. पहिल्या फेजमध्ये 500 ठिकाणी वाय-फाय तर 1 मे 2017 पर्यंत 1200 ठिकाणी फ्री वाय-फाय सुरु होतील असं मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना आश्वासन दिलं होतं. पण यातील काही ठिकाणी जाऊन जेव्हा एबीपी माझानं पडताळणी केली त्यावेळी वाय-फाय सुविधा उपलब्धच नसल्याचं आढळून आलं.

आपले सरकार या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबईकर त्यांच्या आसपास उपलब्ध असलेल्या वाय-फाय हॉटस्पॉटचा शोध घेऊ शकतात. असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. याचीच आम्ही काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन चाचपणी केली.

पहिलं ठिकाण – (मंत्रालय गार्डन गेट)

मुख्यमंत्र्यांनी वाय-फायची घोषणा केली तर खरं, पण साधं मंत्रालयात देखील आपलं सरकार वायफाय अजूनही सुरु नाही. लॉगिन केलं तर वेबसाईटवर OTP सुद्धा येत नाही आणि त्यामुळे इथं वायफाय सुविधा उपलब्ध नाही.

दुसरं ठिकाण – (विधान भवन)

ज्या विधान भवनातून संपूर्ण राज्याचं कामकाज चालतं तिथे देखील वायफायची अवस्था फार बिकट आहे. कारण की, इथं वायफायच्या आपलं सरकार या वेबसाईटला साधं लॉगिनही होता येत नाही.

तिसरं ठिकाण – (मुंबई महापालिका)

या ठिकाणी पोहचल्यानंतर आम्ही एका मुंबईकराला या वायफायबाबत विचारणा केली. तसेच त्याला येथं वायफाय मिळतं की नाही हे देखील पाहायला सांगितलं. पण त्याला देखील आमच्यासारखाच अनुभव आला. ‘वायफाय उपलब्ध नाही’ असाच मेसेज त्यांच्याही मोबाइलच्या स्क्रीनवर झळकला.

मुख्यमंत्र्यांनी वायफायसाठी जी पहिली 500 ठिकाणं घोषित केली हे तीन प्रातिनिधिक पण प्रमुख ठिकाणं आहेत. पण याच प्रमुख ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे इतर ठिकाणांनी काय अवस्था असणार याचा विचारच न केलेला बरा.

दरम्यान, मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन अशी घोषणाही केली होती की, 1 मेपर्यंत 1200 ठिकाणी हॉटस्पॉट सुरु होतील. मात्र, कोणत्या 1200 ठिकाणी वायफाय सुरु झालं याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

त्यामुळे निवडणुकींच्या तोंडावर घोषणा करणं आणि निवडणुका झाल्या की, त्या सोयीस्कररित्या विसरणं असंच चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही माहिती तंत्रज्ञान सचिव विजयकुमार गौतम यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 'दक्षिण मुंबईत काही ठिकाणी हवा किंवा काही गोष्टींमुळे अडचण होते. पण वायफाय पॉईंट्स सुरु आहे. जर वायफाय बंद पडले तर ते आम्ही अर्ध्या तासात  पुन्हा सुरु करतो.' असं ते म्हणाले.

सरकारचं @AS_Mum_WiFi ट्वटिर अकाउंटही जवळपास बंदच

दुसरीकडे वायफायबाबत प्रतिसाद कळविण्यासाठी ट्विटरवर@AS_Mum_WiFi हे हॅन्डल उपलब्ध आहे.  या हॅन्डलवर येणारे प्रतिसाद आणि तक्रारी यांची प्राधान्‍याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र आता हे ट्विटर अकाउंटही जवळजवळ बंदच आहे. कारण की, यावरुन शेवटचा ट्वीट हा 2 फेब्रुवारी 2017 ला करण्यात आला होता.

cm tweet 2

cm tweet 1

काय केली होती घोषणा?

पहिल्या फेजमध्ये 500 हून अधिक ठिकाणी वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याची सविस्तर यादी सरकारनं जारी केली आहे. हॉटस्पॉटच्या माध्यमातून देण्यात येणारी वायफाय सेवा संपूर्णपणे नि:शुल्क असेल. सध्या जवळपास 500 ठिकाणी सुरु करण्यात आलेली वायफाय सेवा 1 मे 2017 पर्यंत 1200 हून अधिक ठिकाणी वायफायचे हॉटस्पॉट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

या प्रणालीसंदर्भातील प्रतिसाद कळविण्यासाठी ट्विटरवर@AS_Mum_WiFi हे हॅन्डल उपलब्ध आहे.  या हॅन्डलवर येणारे प्रतिसाद आणि तक्रारी यांची प्राधान्‍याने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे

संबंधित बातम्या:

मुंबईत 500 ठिकाणी मोफत वायफाय सुविधा सुरु

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV