सूचना की थट्टा?... मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मूर्खपणाचा कळस

मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या जिन्यावर अशा काही सूचना लावल्या आहेत की, त्यामुळे मुंबईकरही बुचकळ्यात पडले आहेत.

सूचना की थट्टा?... मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मूर्खपणाचा कळस

मुंबई : स्टेशनवरच्या पाट्या, रस्त्यांवरचे फलक आणि दुकानांमधल्या सूचना यावर एक विश्वकोष तयार होईल... पण विनोदी. कारण मुंबईमध्ये अशाच सूचनांनी लोकांना हसू अनावर झालं आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या जिन्यावर अशा काही सूचना लावल्या आहेत की, त्यामुळे मुंबईकरही बुचकळ्यात पडले आहेत.

'कृपया लहान चेंडू घेऊ नका….’, मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवरील जिन्यावरील पायऱ्यांवर हे वाक्य पाहायला मिळतं. पण या वाक्याचा नक्की अर्थ काय?

'please do not take short cuts' हे वाक्य तुम्ही गुगल ट्रान्सलेटमध्ये टाकलं तर मराठीत 'कृपया लहान चेंडू घेऊ नका….’ असा त्याचा अर्थ दाखवतं. म्हणजेच गुगलनं जसं भाषांतर करुन दिलं. त्याच भाषांतरातील ओळी जशाच्या तशा छापून त्याचे पोस्टर पायऱ्यांवर लावण्यात आले. हा सर्व प्रताप एका सामाजिक संस्थेनं केल्याची कुणकुणही लागली आहे.

translate

फक्त हे एकच वाक्य नाही तर यासारखी गोंधळ उडवणारी दुसरीही वाक्यं जिन्यांवर लावण्यात आली आहे. 'कृपया घसरनारी बुटे वापरू नका…’ असं वाक्य छापलेलं पोस्टरही या जिन्यावर लावण्यात आलं आहे.

translate 2

जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्यभार बुडाला. अशी एक म्हण आहे. पण आता जो गुगल ट्रान्सलेटवरी विसावला, त्याचा कार्यभार बुडाला. असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, हा सर्व प्रकार सुरु असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं. असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: funny Instruction in Mumbai Railway stations latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV