मुंबईत बाप्पाच्या आगमनाला सुरूवात, मंडळांचे राजे चित्रशाळेतून रवाना

मुंबईतल्या रस्त्यांवर आज बाप्पांच्या आगमनाची धूम पाहायला मिळत आहे. शहरातल्या अनेक बड्या गणपती मंडळांचे बाप्पा आज चित्रशाळेतून आपापल्या मंडपांमध्ये रवाना झाले आहे.

मुंबईत बाप्पाच्या आगमनाला सुरूवात, मंडळांचे राजे चित्रशाळेतून रवाना

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर आज बाप्पांच्या आगमनाची धूम पाहायला मिळत आहे. शहरातल्या अनेक बड्या गणपती मंडळांचे बाप्पा आज चित्रशाळेतून आपापल्या मंडपांमध्ये रवाना झाले आहे.

मुंबईतल्या नामांकित आणि प्रसिद्ध मंडळांपैकी एक चिंचपोकळीच्या चिंतामणी खातू कारखान्यातून आपल्या मंडपाच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. मूर्तीकार विजय खातूंच्या निधनामुळं कारखान्याच्या दरवाजावर यंदा चिंतामणीच्या स्वागताला वाद्यांचा गजर झाला नाही. मात्र, भारतमाता सर्कलच्या पुढे मात्र चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबतच खेतवाडीचा राजा, चंदनवाडीचा राजा, अँटॉफ हिलचा राजा ह्या श्रींच्या मूर्तीदेखील खातू कारखान्यातून रवाना झाल्या आहेत. याशिवाय मुंबईचा राजा, डोंगरीचा राजा, फोर्टचा राजा, मुंबईचा महाराजा आदी मंडळांच्या मूर्ती मंडपाच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

दरम्यान, बाप्पांच्या आगमनासाठी दादर-परळमधल्या वाहतूक मार्गांमध्ये आज बदल करण्यात आलेत. दादर-परळ भागातील विशिष्ट रस्ते हे वाहतुकीसाठी काही तास बंद करण्यात आले असून, तिथली वाहतूक ही पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे.

याशिवाय, लालबाग-परळ परिसरातील गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भोईवाडा आणि भायखळा वाहतूक विभागाचे 50 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तर, शंभरहून अधिक पोलीस मिरवणुकीतील गर्दी नियंत्रणात ठेवत आहेत

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV