घरात घुसून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली.

घरात घुसून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

भिवंडी : आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी  सापळा लावून  दोघांना शिताफीने अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघा नराधमांनी संगनमत करून पीडित तरुणीच्या घरात घुसून आईवडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना घराबाहेर काढलं आणि तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर हे तिघेही फरार झाले. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सापळा रचून  दोघांना अटक केली.

शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान (२४), जावेद शेख (२३) आणि किन्ना अशी आरोपींची नावे आहेत. यापैंकी  इम्रान आणि जावेद यांना गुरुवारी ठाण्याच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gang rape on 17 year old girl in Bhiwandi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV