औरंगाबाद पाठोपाठ मुंबईतही कचराकोंडी?

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे.

औरंगाबाद पाठोपाठ मुंबईतही कचराकोंडी?

मुंबई : एकीकडं औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलेला असतानाच, आता मुंबईतही कचराकोडींचं चित्र आहे. कारण गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांनी यापुढं ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, आणि त्यावर प्रक्रिया केंद्र उभारावी असं मनपानं सांगितलं आहे. मात्र या आदेशाचा सगळीकडे बोजवारा उडाल्याचं दिसत आहे.

त्यामुळे वांद्रेसह अनेक भागात कचरा साठल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे, ज्या शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आहे, त्याच शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणीहून कचरा उचलण्यात आलेला नाही आहे.

काय आहे महापालिकेचा नियम?

मुंबई महापालिकेने 20 हजार चौ.किमीपेक्षा मोठ्या भूखंडावरची गृहसंकुल किंवा ज्या ठिकाणी 100 किलोपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो, अश्या रहिवासी इमारती, उपहारगृह यांना पालिकेची कचरा योजना राबवणं बंधनकारक आहे. त्यानुसार सोसाट्यांनी आपल्या आवारातच ओला-सुका कचरा यांचं वर्गीकरण करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारं केंद्र उभारायचं आहे. शिवाय, या केंद्रातून खतनिर्मिती करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

3300 सोसायट्यांना नोटिसा

पण आतापर्यंत फक्त एक हजार सोसायट्यांनीच कचरानिर्मिती केंद्र उभारले आहेत. तर उर्वरित 1328 सोसायट्यांना हा प्रकल्प राबवण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. तर 3 हजार 300 सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, 13 सोसायट्यांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

एकीकडे महापालिकेनं जरी ‘मुंबई स्वच्छ’ रहावी म्हणून कचरा योजनेचा आराखडा तयार केला आहे. पण पालिकेच्या कचरा योजनेनचा आता बट्याबोळ उडण्याची शक्यता आहे. कारण, महापालिकेच्या नियमांनुसार, अनेक सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण आणि प्रक्रीया करण्याचा प्रकल्प सुरु झाला आहे. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सरसकट कुणाचाच कचरा उचलणार नाही अश्या अवि्र्भावात आहेत. त्यामुळे, सुक्या कचऱ्यांचा प्रश्न मुंबईकरांसमोर उपस्थित झाला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bmc not
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV