श्रीरामपूरमधून हरवलेली मुलगी पनवेलमध्ये सापडली!

श्रद्धा अमोल अदिक ही 8 वर्षांची मुलगी तिसरी इयत्तेत श्रीरामपूर येथील मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे.

श्रीरामपूरमधून हरवलेली मुलगी पनवेलमध्ये सापडली!

पनवेल : भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील श्रद्धा अदिक ही आठ वर्षांची मुलगी शाळेतून घरी जाताना बेपत्ता झाली होती. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रद्धा अदिक ही पनवेल शहर पोलिसांना सापडली असून, सध्या ती सुखरुप आहे. 20 वर्षांचा सुनिल पवार तिला घेऊन आला होता.

श्रद्धा अमोल अदिक ही 8 वर्षांची मुलगी तिसरी इयत्तेत श्रीरामपूर येथील मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शिकते. मंगळवारी शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने शाळा लवकर सोडण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला होता. शाळा सुटल्यानंतर स्कूल बसने श्रद्धाला खानापूर स्टॉपवर सोडले. तसे श्रद्धाच्या कुटुंबियांना शाळेने फोनवरुन कळवलेही होते. मात्र श्रद्धा घरी पोहोचली नव्हती.

पनवेलमधील सांगुर्ली गावात एक 20 वर्षीय मुलाबरोबर लहान मुलगी आल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुनिल पवार याला ताब्यात घेत श्रद्धाची सुटका केली.

सुनिल पवार हा श्रद्धा हिच्या शेजारी राहणारा इसम आहे. तिला पळवून आणण्यामागे त्याचा काय उद्देश होता, हे अजून समोर आलेले नाही. श्रद्धा ही सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी कळवले असून, तिला घेण्यासाठी तिचे पालक पनवेल पोलासांकडे येणार आहेत.

संबंधित बातमी : तणावामुळे शाळा लवकर सुटली, पण मुलगी घरी परतलीच नाही!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Girl missing from Shrirampur found in Panvel latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV