''त्या' कुमारी मातेच्या बाळाला वडिलांच्या नावाविना जन्मदाखला द्या''

मुंबईतील एका 22 वर्षीय अविवाहीत तरुणीने मुलाच्या जन्मदाखल्यावरील पित्याचं नाव काढून टाकण्याची मागणी केली होती. या याचिकेची दखल घेत हायकर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

''त्या' कुमारी मातेच्या बाळाला वडिलांच्या नावाविना जन्मदाखला द्या''

मुंबई : 'त्या' कुमारी मातेच्या बाळाला पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवून जन्मदाखला द्या, असे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. हा महत्त्वपूर्ण निकाल देताना हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील या संदर्भातील एका निकालाचा आधार घेतला.

कुमारी मातेला जन्मदाखल्यावर जन्मदात्या पित्याचं नाव देण्याची सक्ती का? असा सवाल करत मुंबई हायकोर्टात एका तरुणीने याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

मुंबईतील एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीने मुलाच्या जन्मदाखल्यावरील पित्याचं नाव काढून टाकण्याची मागणी केली. या तरुणीच्या दाव्यानुसार, तिने चुकून सदर पुरुषाचं नाव जन्मदात्याचं नाव म्हणून दिलं होतं. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

मागील सुनावणीत यावर हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की, अशा प्रकारे महिलेच्या मनाप्रमाणे पित्याचं नाव काढता किंवा टाकता येणार नाही. या प्रकरणी मंगळवारच्या सुनावणीत जन्मदाखल्यात नाव असलेल्या व्यक्तिला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सदर पुरूषाने हायकोर्टात उपस्थित राहून स्वत:चं नाव जन्मदाखल्यावरुन काढून टाकण्यास हरकत नसल्याचं लेखी हमीपत्र सादर केलं.

त्या महिलेकडून महापालिकेत जन्मदाखल्यासाठी दिलेल्या अर्जात जन्मदात्या पित्याच्या नावाचा कॉलम रिकामा ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र पालिकेने ही विनंती नामंजूर करत त्या मुलीला जन्मदाखला देण्यास नकार दिला. याविरोधात महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: give birth certificate without father’s name directs HC to BMC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV