कुपोषणाच्या समस्येबाबत सरकार गंभीर नाही : मुंबई हायकोर्ट

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 5:24 PM
Government is not serious about Malnutrition, says Mumbai HC latest updates

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : कुपोषण ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीइतकीच गंभीर समस्या आहे, असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, राज्य सरकार कुपोषणाच्या समस्येबाबत अजिबात गंभीर नाही, या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे.

14 ऑगस्टपर्यंत दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करा किंवा या समस्येशी संबंधित असलेले जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिवांना यासाठी जबाबदार धरलं जाईल, असेही हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले आहे.

जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली जर सरकारने उपाययोजना राबवल्या तर पोलिओ आणि देवीप्रमाणे कुपोषणही हद्दपार करता येईल, असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सराकारला डॉ. अभय बंग यांच्या रिपोर्टवर गांभीर्यानं विचार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर डॉ. अभय बंग यांनी आपला रिपोर्ट सादर केला होता.

डॉ. बंग यांनी सांगितलं की, “2004 मध्येही त्यांनी नंदुरबार, धुळे व मेळघाट येथील कुपोषणाच्या समस्येबाबत हायकोर्टात आपली मत मांडली होती. मात्र, आज 13 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही. ज्यागतीने कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबायला हवे आहेत, त्या गतीने ते थांबलेले नाहीत. आजही राज्यभरात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वर्षाला 11 हजारांच्या घरात आहे. ज्यात नवजात बालकांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. यातही 50 टक्के मुलांचा मृत्यू महिन्याभरातच होतो. याशिवाय मलेरिया, न्यूमोनिया, जुलाब यांसारखे साथीचे रोग आहेतच.”

राज्यभरातून दरवर्षी जवळपास 2 हजार विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडतात. मात्र, ते दुर्गम भागात जाऊन आपली सेवा देणे पसंत करत नाहीत. शिवाय, सेवा बाँडचा भंग केल्याबद्दल दंड म्हणून जी रक्कम भरणं गरजेचं ती देखील भरत नाहीत. त्यामुळे राज्याला दरवर्षी सुमारे 900 कोटींचं नुकसान होत आहे. मात्र, याकडे कुणीही गांभीर्यानं पाहात नाही, याबाबत डॉ. अभय बंग यांनी खंत व्यक्त केली.

डॉ. अभय बंग यांनी सुचवलेले उपाय : 

  • राज्यातील आश्रमशाळा अधिक सशक्त करा.
  • डॉक्टरांना ग्रामीण आणि दुर्गम भागातील सेवाबौंड सक्तीचा करा.
  • प्रत्येक गावात होम बेस केअर सेवा उपलब्ध करावी.
  • आदिवासी भागांत दारूबंदी आणि तंबाखुमुक्ती लागू करावी.
  • आदिवासी भागांत नशामुक्त गाव, कुपोषणमुक्त गाव असे पुरस्कार सुरू करावेत.
  • आदिवासी महिलांना जेवण देण्याऐवजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत.
  • दुर्गम भागात साथीच्या रोगांवरील औषध सहज उपलब्ध करावीत.
  • सरकारी योजना आदिवासी भागांत पोहचतायत का? त्यावर अंमल होतोय का? याची चाचपणी वेळोवेळी करावी.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Government is not serious about Malnutrition, says Mumbai HC latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी...

नवी दिल्ली : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित… 2008 च्या मालेगाव

चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी
चालकाला चक्कर आल्याने एसटी शेतात घुसली, 43 प्रवासी जखमी

सातारा : एसटी चालकाला चक्कर आल्यामुळे बस शेतात घुसल्याची घटना

राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची तयारी
राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्याची चंद्रकांतदादांची...

सिंधुदुर्ग : एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी

VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार

राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी

नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017   राज्यभरात पावसाचं दमदार

भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार
भाजपमध्ये कोणाला घ्यायचं, याचे निर्णय कोल्हापुरातून : पवार

कोल्हापूर :  सरकारमध्ये मंत्री कोण असावं, कोण नसावं, याचा निर्णय

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात

रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त  करण्यात आलं

नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.