काही शेतकऱ्यांचीच दिवाळी, इतरांनी कर्जमाफीची वाट पाहा!

येत्या दोन दिवसात म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून सरकार काही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही शेतकऱ्यांचीच दिवाळी, इतरांनी कर्जमाफीची वाट पाहा!

मुंबई: राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास 4 महिने होत आले आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

येत्या दोन दिवसात म्हणजेच 18 ऑक्टोबरपासून सरकार काही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील.

उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.

राज्य सरकारने 24 जून 2017 रोजी कर्जमाफीची घोषणा केली. दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेला येत्या 24 ऑक्टोबरला चार महिने पूर्ण होतील.

कर्जमाफीचे ऑनलाईन फॉर्म भरणं, त्यातील तांत्रिक अडचणी, लोडशेडिंग आणि त्यातच पेरणी-सुगीचे दिवस असं चक्रव्यूह भेदत शेतकऱ्यानी ही प्रक्रिया पूर्ण केली. मात्र अनेकांना ही अवघड प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑक्टोबरअखेरची वाट पाहावी लागणार आहे.

कर्जमाफीची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून रोजी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून, त्याचा लाभ 89 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा, राज्य सरकारने केला होता.

शिवाय, कर्जमाफीमुळे 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल आणि उर्वरित 6 टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या परतफेडीत दीड लाख रुपये राज्य सरकारचा वाटा असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान म्हणून दिलं जाणार आहे.

तर आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी, करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

अखेर कर्जमाफीला मुहूर्त, 18 ऑक्टोबरपासून थेट खात्यात पैसे : सूत्र

कर्जमाफीसाठी राज्यभरातून 77 लाख अर्जशेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर


34 हजार कोटींची कर्जमाफी...

कुठल्या राज्यात किती कोटीची कर्जमाफी?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV