दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार

14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल.

दाऊदच्या सहा मालमत्तांचा केंद्राकडून लिलाव होणार

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. दाऊदच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी केंद्राने हॉटेल रौनक अफरोझ म्हणजेच 'दिल्ली झायका'चा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. आता याच हॉटेलसोबत आणखी पाच मालमत्तांचा लिलाव करण्याची घोषणा अर्थमंत्रालयाने केली आहे.

स्मगलर्स आणि परदेशी विनिमय नियंत्रक कायद्या (SAFEMA)च्या प्रशासकांनी वर्तमानपत्रात सार्वजनिक लिलावासंदर्भात जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल.

यामध्ये भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारतीचा समावेश आहे. या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत असे. दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती.

याशिवाय मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस, माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट, सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार आणि औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट या मालमत्तांचा लिलाव होईल.

याआधी, पत्रकार एस बालकृष्णन यांचा एनजीओ 'देश सेवा समिती'ने हॉटेल रौनक अफरोझसाठी 4.28 कोटी रुपयांची सर्वाधिक किमतीची बोली लावली होती. 30 लाखांची अनामत रक्कम भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 3.98 कोटींची रक्कम भरता न आल्यामुळे ती मालमत्ता त्यांच्या हातून निसटली.

यावेळी हॉटेल रौनक अफरोझसाठी अनामत रक्कम 6.28 लाखांनी घटवून 23.72 लाख रुपये करण्यात आली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 6 ते 8 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV