तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत

सकाळी साडे दहापासून ठप्प असलेली हार्बर मार्गावरील लोकल सेवा अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. यानंतर हार्बर मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत

 

नवी मुंबई :  सकाळी साडे दहापासून ठप्प असलेली हार्बर मार्गावरील लोकल सेवा अखेर सुरु झाली. पाच तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर लाईनची वाहतूक सुरु झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सकाळी बेलापूर स्थानकातील ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वायर लोकलच्या डब्ब्यावर पडल्यानं मोठा स्पार्क झाला होता. त्यानंतर प्रवाशांनी घाबरुन खाली उड्या मारल्या. यात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

यानंतर हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अखेर पाच तासानंतर ओव्हरहेड वायर जोडून, पुन्हा लोकल वाहतूक सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उरण मार्गाच्या नुतनीकरणासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळं नेरुळ ते पनवेल ही सेवा पूर्णपणे ठप्प होती. पण काल रात्री ही सेवा सुरु झाली. मात्र, आज सकाळी पुन्हा ही ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडूनही कोणतेही अपडेट देण्यात येत नव्हते. उलट मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त असल्याचं सांगण्यात येत होतं.

संबंधित बातम्या

हार्बर रेल्वे ठप्प, अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त


रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: harbor line disturbance latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV