हार्बर रेल्वे ठप्प, अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त आहेत.

हार्बर रेल्वे ठप्प, अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त

मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक बेलापर ते पनवेलदरम्यान सकाळी अकरा वाजल्यापासून खोळंबली आहे. मात्र मध्य रेल्वेचे अधिकारी याबाबत कोणतीही अपडेट द्यायला तयारी नाहीत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जापनीज लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त आहेत.

हार्बरची वाहतूक ठप्प झाल्याने सकाळपासून प्रवाशांचे हाल सुरु होते. अर्ध्या तासात वाहतूक सुरु होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र लोकल वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. एबीपी माझाने मध्य रेल्वेशी याबाबतची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र अधिकारी व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं.

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी पूर्ववत झालेली नाही.

उरण-बेलापूर मार्गाच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात आता मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत.

संबंधित बातमी :

रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: harbor railway issue central railway officers not responding for updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV