फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात, फेरीवाल्यांचा मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ

सोशल मीडियावर गटाराची झाकणं काढून त्यातून फळे, भाज्यांचे बॉक्स बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात, फेरीवाल्यांचा मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ

मुंबई : मुंबईतील फेरीवाले नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाल्यांनी फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवल्या गेल्या. सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तुम्ही-आम्ही विकत घेणाऱ्या फळ-भाज्या कुठे ठेवल्या जातात ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. वाकोला परिसरात पालिकेची कारवाई टाळण्यासाठी फेरीवाले रस्त्याशेजारील गटारांमध्ये फळे, भाज्यांच्या पेट्या लपवून ठेवतानाची दृश्य समोर आली आहेत.

सोशल मीडियावर गटाराची झाकणं काढून त्यातून फळे, भाज्यांचे बॉक्स बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

MUM bhajiwala

केवळ एकच फेरीवाला नव्हे तर रांगेने सर्वच फेरीवाले अशा प्रकारे गटारात माल ठेवत असल्याचं दिसतं आहे. कारण प्रत्येक गटाराच्या झाकणाजवळून माल बाहेर काढला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत लोकल ट्रॅक शेजारील भाज्यांवर नाक मुरडणाऱ्यांना फेरीवाल्यांकडची भाजी-फळं विकत घेतानाही विचार करावा लागणार आहे.

पाहा बातमीचा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Hawkers kept fruit and vegetable boxes in drainage hole
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV