मुंबई आणि उपनगरांमध्ये धुक्याची चादर, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

पहाटेपासून आज (शनिवार) सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये धुक्याची चादर, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई : पहाटेपासून आज (शनिवार) सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते आहे. तसंच मुंबईतील पाराही घसरल्यानं थंडीही वाढली आहे. काही भागात धुकं इतकं दाट आहे की काही अंतरावरचंही दिसत नाही. त्यामुळं दिवस उजाडूनसुद्धा रस्त्यांवर वाहनांना हेडलाईट लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही.

या धुक्याचा परिणाम रस्ते आणि लोकल वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज मुंबईकरांना कामावर पोहचण्यास थोडा उशीर  होऊ शकतो.

दरम्यान, दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरु असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 50 मिनिटं उशीरानं सुरु आहे.

संबंधित बातम्या :

वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: heavy fog in Mumbai rail traffic affected latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV