मुंबईत विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस

दक्षिण, पश्चिम, मध्य मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत दमदार पाऊस सुरु आहे.

मुंबईत विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस

मुंबई : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

इथे दुपारपासूनच काळोख पसरला होता. आभाळ भरुन आलं, त्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण, पश्चिम, मध्य मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत दमदार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या अंडर-17 फुटबॉल विश्वचषकचा सामना नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. त्यातच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV