मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार कमबॅक

मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला.

By: | Last Updated: 13 Sep 2017 12:36 PM
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार कमबॅक

मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

उन्हाच्या झळांनी हैराण मुंबईकर सुखावले

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाळी झळ भासत असतानाच, काल रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. काल मध्यरात्री मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे.

नवी मुंबईतील काही भागात वीजपुरवठा खंडित

तर तिकडे नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करावा लागला.

पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

जोरदार पावसामुळे झाड कोसळून वाहतूककोंडी

जोरदार पावसानं काल रात्री लातूरला अक्षरश: झोडपून काढलं. पावसाच्या जोरानं शहरातील नाना-नानी पार्क समोरील भेळच्या गाडीवर झाड कोसळलं, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकही बंद आहे. तसंच कोल्हेनगर, श्रीकृष्णनगर, कोयना रोड, बादाडे नगर आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तुफान पावसाने अंबेजोगाई शहर जलमय

बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. अंबाजोगाई शहरात सर्वत्र पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही पाणी साचलं आहे. बीडमधील बिंदुसरा नदी ओव्हरफ्लो वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं बीड  शहरातील दगडी पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. दरम्यान, नदीवरील दगडी पुलावरून आज सकाळी एक गाय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

साताऱ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग

साताऱ्यातही रात्री 11.30 वाजल्यापासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार बरसणारा पावसाने पहाटे पाच वाजण्याता उघडीप दिली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV