आ. प्रताप सरनाईकांकडून शिल्पकार प्रमोद कांबळेंना मदतीचा हात

आमदार प्रताप सरनाईक यांच्या फांऊडेशनच्या वतीने मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हलदरम्यान प्रमोद कांबळे यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

आ. प्रताप सरनाईकांकडून शिल्पकार प्रमोद कांबळेंना मदतीचा हात

मुंबई : प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा अहमदनगरमधील स्टुडिओ काही दिवसांपूर्वीच भीषण आगीत जळून खाक झाला होता. यावेळी त्यात त्यांची प्रमाणपत्रं, साहित्य व अनेक शिल्प जळून खाक झाली होती. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. पण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आता प्रमोद कांबळे यांना मदतीचा हात देऊ केला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या फांऊडेशनच्या वतीने मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हलदरम्यान प्रमोद कांबळे यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये शिल्पकार प्रमोद कांबळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे दहा फुटी शिल्प साकारणार आहेत. मिरा-भाईंदर मधील नागरिकांना व कलाप्रेमींना हा महोत्सव एक पर्वणीच ठरणार आहे

२० ते २३ एप्रिल २०१८ रोजी मिरा-भाईंदर शहरात होणाऱ्या आर्ट फेस्टिव्हलदरम्यान अनेक जागतिक दर्जाचे कलावंत उपस्थित असणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मनोरंजन, खाद्य, कला यांची मांदियाळी नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. त्याचप्रमाणे कैलाश खैर, ओसमान मीर, मामे खान, तसेच रुपकुमार राठोड आदी कलाकार यावेळी आपली कला सादर करणार आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: helping hand from the MLA Pratap Sarnaika to the Craftsman Pramod Kamble latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV