जिया खान आत्महत्या : सुरजच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

30 जानेवारी 2018 रोजी जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते.

जिया खान आत्महत्या : सुरजच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोलीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे सूरजला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी आदेश दिले आहेत.

जिया खान आत्महत्या प्रकरणी सेशन्स कोर्टात सुरु असलेला खटला जलदगतीने चालवून निकाल लावण्यात यावा, अशी सुरज पांचोलीने याचिका केली आहे. त्यावर आज सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला.

सुरजवर आरोप निश्चित

30 जानेवारी 2018 रोजी जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते. कलम 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सुरजवर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र सुरजने त्यावेळी कोर्टात त्याच्यावरील आरोप फेटाळले. तसेच या संपूर्ण प्रकरणी आपण निर्दोष असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं होतं.

जियाची आत्महत्या

3 जून 2013 रोजी जिया खानने जुहू येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी 2 जुलै रोजी जियाचा कथित प्रियकर सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच मुंबई हायकोर्टाने सुरजला जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर जिया खानची आई राबिया खानने सुरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली.

2014 मध्ये मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयने सुरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आरोपपत्र दाखल केले होते. ते आरोप 30 जानेवारी 2018 रोजी निश्चित झाले होते.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Highcourt refuse to hearing on Suraj Pancholi’s plea in Jia Khan Suicide Case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV