मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास

मुंबई : मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी अनेक पर्याय आणि आकड्यांची जुळवाजुळव करण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरु आहेत. यासाठी फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

मात्र 1992 ते 1997 या कालावधीत जेव्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस फोडाफोडीचं राजकारण करून शिवसेनेने आपला महापौर बसवला होता. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि राज ठाकरे हे या फोडाफोडीच्या राजकारणाचे मुख्य सूत्रधार होते आणि त्यांनी ही जबादारी यशस्वीरित्या पार पाडली होती.

कुठल्याही पक्षाचे एक तृतीयांश नगरसेवक फोडले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित पक्ष नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करु शकत नाही. त्यावेळेस बहुमताचा आकडा काँग्रेसकडे होता. मात्र अर्ध्याहून अधिक नगरसेवकांना फोडून त्यांना राजीनामे देण्यास शिवसेनेनं भाग पाडलं.

काँग्रेसचे नगरसेवक विजय लोके यांच्या माध्यमातून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यात आले आणि फक्त 20 ते 25 नगरसेवकांची संख्या काँग्रेसकडे उरली. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम होता. मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांनीही शिवसेनेला मदत केली होती.

एका रात्रीत मनोहर जोशी यांनी त्यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक मिलिंद वैद्य यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना महापौरपदी विराजमान केलं होतं. मिलिंद वैद्य हे सर्वात तरुण महापौर झाले होते आणि तेव्हापासून आजतागयत मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसला आहे.

महत्त्वाचं म्हणजे आज उद्धव ठाकरे यांनी बंद दारवाजाआड सुमारे दोन तास मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे मागच्या संदर्भांची उजळणी आणि भविष्यात त्याचा वापर कसा करता येईल याबाबाबत उद्धव यांनी या दोन ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे कळते.

कोणत्याही संकटसमयी घरच्या जुन्या जणत्यांचे मत घेऊनच पुढची वाटचाल करावी अशी एक सर्वसाधारण समजूत आपल्याकडे असते. बहुदा उद्धव ठाकरे याच दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसतं.

त्यावेळचं संख्याबळ:

काँग्रेस 112
शिवसेना 69
भाजप 14
मुस्लिम लीग 5
माकप 2
कामगार आघाडी 1
जनता दल 8
अपक्ष 9

First Published: Wednesday, 1 March 2017 6:31 PM

Related Stories

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून

तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण जसंच्या तसं
तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण...

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं

भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक
भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक

भिवंडी : भिवंडीजवळच्या अंबाडी नाका भागातून मोठ्या प्रमाणात

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस

भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्यांना उमेदवारी : धनंजय मुंडे
भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्यांना उमेदवारी : धनंजय मुंडे

पनवेल : पनवेल महापालिकेत भाजपनं वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

उल्हासनगरमध्ये चोरीचा आळ घेत दोन मुलांचं मुंडन, दुकानदारावर गुन्हा दाखल
उल्हासनगरमध्ये चोरीचा आळ घेत दोन मुलांचं मुंडन, दुकानदारावर...

उल्हासनगर : चोरीचा आळ घेत दोन लहान मुलांचं अर्ध मुंडण करुन

दादरमध्ये खासगी बस उलटली, एकाचा मृत्यू तर 35 प्रवासी जखमी
दादरमध्ये खासगी बस उलटली, एकाचा मृत्यू तर 35 प्रवासी जखमी

मुंबई : मुंबईतल्या दादर टीटी भागात एक खासगी बस पटली झाली आहे. यामध्ये

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : ओव्हरहेड वायर आणि सिग्नल दुरुस्तीसारख्या विविध

'तानाजी मालुसरेंचं टोपणनाव 'सिंह', म्हणून कोंढाण्याचा सिंहगड'
'तानाजी मालुसरेंचं टोपणनाव 'सिंह', म्हणून कोंढाण्याचा सिंहगड'

विरार : भविष्यात चुका होऊ नये म्हणून आपण इतिहास शिकतो. मात्र भावी