मुंबईत घरं महागणार, पालिकेचा खर्च भागवण्यासाठी छाननी शुल्क वाढीचा प्रस्ताव

विकास नियंत्रण नियमावलीतल्या तरतुदींनुसार विकासकामांना परवानगी देण्यासह विकास हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या छाननी शुल्कात पालिकेनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत घरं महागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 12 September 2017 12:17 PM
Home prices rise in Mumbai latest update

मुंबई : मुंबईतल्या घरांचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कारण, विकास नियंत्रण नियमावलीतल्या तरतुदींनुसार विकासकामांना परवानगी देण्यासह विकास हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या छाननी शुल्कात पालिकेनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी या शुल्कात 10 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.

मुंबई महापालिका विविध सेवा सुविधा पुरवत असताना काही सेवांवर खातेनिहाय शुल्क आकारण्यात येते. 2004 पासून भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार छाननी शुल्क आकारण्यात येतं.

शासनाच्या 16 नोव्हेंबर 2016 च्या अधिसूचनेनुसार मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे 2.50 व 2 याप्रमाणे हस्तांतरित शुल्क देण्यात येतं. पण आता हस्तांतरित विकास हक्क क्षेत्रफळानुसार छाननी शुल्क आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे महसुलात 100 ते 150 टक्के वाढ होण्याची अपेक्षा पालिकेच्या विकास नियोजन विभागाला आहे.

2009 ते 2014 या पाच वर्षात मासिक वेतन निर्देशांकामध्ये दरवर्षी सरासरी 9.42 टक्के इतकी वाढ करण्यात येत होती. पण पालिकेचा वाढता आस्थापना खर्चासह प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी छाननी शुल्कात 25 टक्केपर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे. त्याशिवाय प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचेही पालिकेच्या विकास नियोजन विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

सध्या शुल्कवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतर शुल्कवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रत्येक वर्षी 1 एप्रिलपासून 10 टक्के शुल्कवाढीचा अधिकार महापालिका प्रशासनाकडे स्वत:कडे राखून ठेवला आहे. ही शुल्कवाढ लागू झाल्यानंतर, याचा थेट परिणाम मुंबईतल्या घरांच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Home prices rise in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO: ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट गर्लचा अपघात, थरार कॅमेऱ्यात कैद
VIDEO: ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट गर्लचा अपघात, थरार कॅमेऱ्यात कैद

कल्याण : जत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा

‘नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करा!’
‘नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करा!’

मुंबई : नानावटी रुग्णालयाच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई विमानतळासारखी सुरक्षा जगात कुठेही नाही!
मुंबई विमानतळासारखी सुरक्षा जगात कुठेही नाही!

मुंबई : जगात मुंबई विमानतळ सर्वाधिक सुरक्षित आहे. मुंबई

पत्नी अदलाबदलीची ऑफर देणाऱ्या मित्राची निर्घृण हत्या
पत्नी अदलाबदलीची ऑफर देणाऱ्या मित्राची निर्घृण हत्या

मुंबई : पत्नी बदलण्याची ऑफर दिल्यानं मुंबईत मित्राची हत्या

नारायण राणेंचा भाजप प्रवेश नेमका कधी?
नारायण राणेंचा भाजप प्रवेश नेमका कधी?

मुंबई : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं...

मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण आलं आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई

मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात...

मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा

2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन
2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन

मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या

घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार
घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपनं