1 लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकार तुमचा खिसा कितीला कापतं?

पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढल्यास दरांमध्येही वाढ होते. हा अधिभार म्हणजेच एक्साईज कर केंद्राच्या तिजोरीत जातो. तर राज्य सरकारकडून व्हॅटची आकारणी केली जाते. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या प्रत्येक थेंबागणिक तुमच्या खिशाला चाट बसतो.

1 लिटर पेट्रोल-डिझेल भरता, तेव्हा सरकार तुमचा खिसा कितीला कापतं?

मुंबई : आपण एक लीटर पेट्रोल गाडीत टाकतो, त्यावेळी सरकारी तिजोरीत नेमकी किती रुपयांची भर पडते, हा प्रश्न अनेक वाहनचालकांना कायम पडतो.

पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढल्यास दरांमध्येही वाढ होते. हा अधिभार म्हणजेच एक्साईज कर केंद्राच्या तिजोरीत जातो. तर राज्य सरकारकडून व्हॅटची आकारणी केली जाते. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या प्रत्येक थेंबागणिक तुमच्या खिशाला चाट बसतो.

पेट्रोलच्या एकूण दरातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत किती रुपये जातात, हे मुंबईतील पेट्रोलच्या दराचं उदाहरण घेऊन समजून घेऊया.

पेट्रोलचे किती रुपये सरकारला जातात?

मुंबईत पेट्रोलचा 14 सप्टेंबर 2017 चा दर 79 रुपये 50 पैसे आहे. 1 जुलै 2017 पासून पेट्रोल दर नियमित बदलते.

पेट्रोल भरल्यावर प्रत्येक लिटरमागे दराच्या 26 टक्के रक्कम अधिक प्रतिलिटर 11 रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जातात.

म्हणजेच चालू दराने प्रत्येक लीटरमागे सुमारे 20 रुपये 67 पैसे व्हॅट अधिक 11 रुपये प्रति लिटर सरचार्ज असे एकूण 31.67 रुपये राज्य सरकारला मिळतात.

तर पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी लीटरमागे 21 रुपये 48 पैसे आहे. म्हणजेच पेट्रोलच्या लीटरमागे केंद्र सरकारच्या तिजोरीत 21.48 पैसे जातात.

थोडक्यात पेट्रोलच्या प्रत्येक लीटरमागे राज्य सरकारला 31 रुपये 67 पैसे आणि केंद्र सरकारला 21 रुपये 48 पैसे मिळतात.

म्हणजेच  दोन्ही केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारकडे लीटरमागे एकूण 53 रुपये 15 पैसे जातात. याचा अर्थ तुम्ही 79.50 रुपयांचं एक लिटर पेट्रोल भरता, त्यावेळी तुमच्या गाडीत 26.35 रुपयांचं पेट्रोल आलेलं असतं.

डिझेलचे किती रुपये सरकारच्या तिजोरीत?

मुंबईत डिझेलचा दर 62 रुपये 40 पैसे आहे. डिझेल भरल्यावर प्रत्येक लीटरमागे दराच्या 24 टक्के अधिक प्रतिलीटर 2 रुपये सरकारी तिजोरीत जातात. म्हणजेच तुम्ही गाडीत एक लिटर डिझेल भरल्यावर राज्य सरकारच्या तिजोरीत 14.97 रुपयांची भर पडते. तर केंद्र सरकारची डिझेलवरील एक्साईज ड्युटी 17.33 रुपये आहे. म्हणजेच एक्साईजच्या माध्यमातून आपण एक लिटर डिझेल भरतो तेव्हा केंद्राच्या तिजोरीत 17.33 रुपयांची भर पडते.

थोडक्यात म्हणजेच डिझेलच्या प्रत्येक लीटरमागे राज्य सरकारच्या तिजोरीत 14.97 रुपये, तर केंद्र सरकारच्या तिजोरीत 17.33 रुपये जमा होतात. म्हणजेच राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला एका लीटरमागे 32.30 रुपये मिळतात. याचा अर्थ तुम्ही 62.40 रुपये या भावाने एक लीटर डिझेल भरता, तेव्हा तुमच्या गाडीत फक्त 30.10 रुपयांचंच डिझेल येतं.

संबंधित बातम्या

एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली का?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV