मुंबईकरांनो सांभाळा, धुलिकणांमध्ये प्रचंड वाढ

मुंबईतील हवेत धुलिकणांची संख्या वाढत आहे. मुंबईकर अनुभवत असलेली गुलाबी थंडी आपल्या सोबत धुलिकण घेऊन आली आहे.

मुंबईकरांनो सांभाळा, धुलिकणांमध्ये प्रचंड वाढ

मुंबई : मुंबईतील हवेत धुलिकणांची संख्या वाढत आहे. मुंबईकर अनुभवत असलेली गुलाबी थंडी आपल्या सोबत धुलिकण घेऊन आली आहे.  ही परिस्थिती 31 डिसेंबरपर्यंत कायम असणार असल्याची माहिती सफर संस्थेने दिली आहे.

पारा घसरल्याने आणि वाऱ्याची गती कमी झाल्याने आर्द्रता वाढून धुलिकणांची संख्या वाढल्याचा अहवाल सफर या संस्थेने दिला आहे. यामुळे ज्यांना दम्याचा, अस्थम्याचा त्रास आहे अश्या लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.

मुंबईतील हवेत 2.5 पीएम धुलिकणांची संख्या वाढलीय. यामुळं ३१ डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहणार आहे.

दरम्यान, ज्यांना दमा, अस्थम्याचा त्रास आहे त्यांनी मास्क घालूनच किंवा महिलांनी स्कार्फ तोंडाभोवती गुंडाळूनच घराबाहेर पडावे.  नव्या वर्षातही मुंबईत थंडी कायम राहणार असल्याच अंदाज आहे. परंतु तोवर हवेतील धुलिकणांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: In the air of Mumbai there was a lot of dust latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV