आयकर वसुलीत 26.2 टक्क्यांची वाढ, मुंबईतून सर्वाधिक करवसुली

By: | Last Updated: > Saturday, 17 June 2017 6:23 PM
आयकर वसुलीत 26.2 टक्क्यांची वाढ, मुंबईतून सर्वाधिक करवसुली

फाईल फोटो

नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशातून आयकर वसुली चांगली झालू असून, 15 जूनपर्यंत करवसुलीच्या प्रमाणात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 जूनपर्यंत संपूर्ण देशभरातून 1,01,024 कोटी रुपये आयकर वसुली झाली आहे. गेल्यावर्षी याच काळातील हा आकडा 80,075 कोटी रुपये होता. आयकर वसुलीचे प्रमाण वाढल्याने, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास पुरक ठरेल असं बोललं जात आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 जूनपर्यंत चार महानगरातील मुंबईतून सर्वाधिक करवसुली झाली. यात मुंबईतून करवसुलीचं प्रमाण 138 टक्क्यांनी वाढू होऊन, 22,884 कोटी आयकर वसुली झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 9,614 कोटी रुपये होता. संपूर्ण देशाचा विचार केल्यास मुंबईतून करवसुलीचं प्रमाण एक तृतीयांश असल्याचं सांगण्यात येत आहे.

यानंतर दुसरा क्रमांक दिल्लीचा असून, दिल्लीतून 15 जूनपर्यंत 38 टक्के म्हणजे 11,582 कोटी रुपये करवसुली झाली. गेल्यावर्षी हा आकडा 8 हजार 334 कोटी रुपये होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामधून 7 टक्के म्हणजे, 4,084 कोटी रुपये करवसुली झाली. गेल्यावर्षी हा आकडा 3 हजार 815 कोटी रुपये होता.

तर बंगळुरुमधून करवसुलीत 6.8 टक्के वाढ होऊन, 14 हजार 923 कोटी रुपये झाली. गेल्यावर्षी हाच आकडा 13 हजार 973 कोटी रुपये होता. तर चेन्नईमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी करवसुली झाली. यंदा चेन्नईमधून 8591 कोटी रुपये करवसुली झाली असून, गेल्या वर्षी हाच आकडा 8 हजार 968 कोटी रुपये होता.

नामांकित कंपन्या आणि आयकर भरणाऱ्यांना सोपं जावं म्हणून, आयकर विभागाकडून तिमहीच्या शेवच्या महिन्यातील 15 तारेखेपर्यंत आयकर भरण्यास परवानगी देते. त्याचा यंदा चांगलाच फायदा झाल्याचं चित्रं आहे.

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?
SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या 50 बँकांच्या यादीत समावेश असलेल्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!
दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!

रायपूर (छत्तीसगड): दोन खोल्यांचं घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे

हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना
हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना

लाहोर : श्रीनगरच्या पांथा चौकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं लाहोर

सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा
सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी

‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान मोदी
‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान...

व्हिर्जीनिया (अमेरिका) : ‘सर्जिकल स्ट्राईबद्दल एकाही देशाची

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक

जम्मू-काश्मीर: सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं

सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी
सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी

व्हर्जिनिया (अमेरिका): अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद

VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर
VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर

लखनौ : भाजप कार्यकर्त्यांच्या मुजोरीला न जुमानता ड्युटी बजावणारी