दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती

धक्कादायक म्हणजे, 2016 मध्ये ठाण्यातील दोन नगरसेक माझ्याकडे जेवायला आले होते, असेही इक्बाल कासकराने आयबीला सांगितले.

दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पाकिस्तानातील कराचीमध्ये चार घरं आहेत, अशी माहिती दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने गुप्तचर यंत्रणेला (आयबी) दिली. याचसोबत इक्बाल कासकरने दाऊदबद्दल आणखीही महत्त्वपूर्ण माहिती आयबीला सांगितली.

गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची कसून चौकशी केली जात आहे.

पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊद इब्राहिमची चार घरं आहेत. या माहितीसोबतच दाऊदशी शेवटचा संपर्क कधी झाला, हेही इक्बालने आयबीला सांगितलं. शिवाय दाऊदच्या कुटुंबाबाबतही त्याने आयबीला माहिती दिली. इक्बाल कासकरने दाऊदबाबत अनेक गोष्टी आयबीला सांगितल्या.

धक्कादायक म्हणजे, 2016 मध्ये ठाण्यातील दोन नगरसेवक माझ्याकडे जेवायला आले होते, असेही इक्बाल कासकराने आयबीला सांगितले.

इक्बाल कासकरची आयबीकडून अद्यापही चौकशी सुरु आहे. इक्बालकडून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने अटक केली. पोलिसांनी इक्बालसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संबंधित बातम्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत

अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं धडाक्यात कमबॅक

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV