अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस

इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या हसिना पारकरच्या घरातून अटक केली. त्यावेळी तो कौन बनेगा करोडपती पाहात बिर्याणी खात होता, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस

ठाणे: अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला, खंडणीप्रकरणात बेड्या ठोकल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या हसिना पारकरच्या घरातून अटक केली. त्यावेळी तो कौन बनेगा करोडपती पाहात बिर्याणी खात होता, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

"इक्बाल कासकरने बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅटची मागणी केली होती. ही टोळी दाऊद चालवत असल्याची शंका आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काही राजकीय व्यक्तींचीही नावं आहेत", अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

Iqbal Kaskar (3)

परमवीर सिंह यांनी दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

परमवीर सिंह म्हणाले, “इक्बाल कासकर खंडणीचं रॅकेट चालवत होता. काल रात्री ठाणे पोलिसांच्या एटीएसनं घरी जाऊन त्याला अटक केली.

इक्बाल कासकर तक्रारदाराला 2013 पासून खंडणीसाठी धमकी देत होता. तक्रारदाराने 2016 पर्यंत कासकरला चार फ्लॅट्स आणि रोख रक्कम दिली. पण त्यानंतर त्याने आणखी पैसे देण्यास नकार दिला. इक्बालने 4 फ्लॅट्स आणि 30 लाख रोख अशी खंडणी मागितली होती. इक्बाल कासकर वारंवार तक्रारदाराला धमकी देत होता. अखेर काल रात्री त्याने याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर इक्बालला बेड्या ठोकल्या".

इक्बाल कास्करसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मकोका लावण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. खंडणीच्या या रॅकेटमध्ये दाऊदचा समावेश आहे की नाही ते तपासलं जातंय. प्रमुख आरोपी इक्बाल कासकर हा ‘ड्रग अॅडिक्ट’ आहे. ड्रग डिलर – ड्रग तस्कर ख्वाजा शेखला त्याच्यासोबत अटक केल्यानं ड्रग तस्करीच्या दिशेनेही तपास सुरु आहे.

इक्बाल कासकरने मुंबई, ठाणे, वाशीमधल्या अनेक मोठ्या बिल्डर्सला खंडणीसाठी धमकावल्याच्या तक्रारी आहेत. ठाण्यातले काही बिल्डर या खंडणीखोरांची मदत घेत असल्याचं कळतं.

नगरसेवक आणि त्यापेक्षा मोठे राजकारण्यांचाही या रॅकेटमधे समावेश असल्याची महिती आहे, तेही तपासलं जातंय, असं परमवीर सिंह म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV