मस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

हार्बर रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे रुळावर तीन लोखंडी रॉड पडलेले दिसून आलं.

मस्जिद बंदरजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मुंबई : हार्बर रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे रुळावर तीन लोखंडी रॉड पडलेले दिसून आलं. ही गोष्ट मोटरमनच्या वेळीच लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली.

मोटरमन अनुराग शुक्ला यांनी प्रसंगावधान राखत तातडीने लोकल थांबवली. यामुळे हा अपघात टळला. त्यानंतर ट्रॅकवरील ते लोखंडी रॉड हटवण्यात आले. पण हे रॉड नेमके आले कुठून याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. याप्रकरणी आरपीएफ रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, याआधी अनेक ठिकाणी असे प्रकार झाल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे कुणी घातपातच्या दृष्टीनं तर हे रॉड टाकले नव्हते ना? या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Iron rod on the railway track near the masjid bandar railway station latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV