380 ब्रॅण्डचे लोगो टॅटूने गोंदले, मानेपासून पायापर्यंत अंगभर टॅटू

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 9 February 2017 1:24 PM
380 ब्रॅण्डचे लोगो टॅटूने गोंदले, मानेपासून पायापर्यंत अंगभर टॅटू

Photo twitter-

मुंबई: स्टाईल म्हणून हातावर, दंडावर, मानेवर टॅटू काढलेलं आपण पाहिलं आहे. मात्र संपूर्ण शरीरभर जवळपास 400 हून अधिक टॅटू काढलेला एक तरुण, सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

जेसन जॉर्ज असं या तरुणाचं नाव असून, तो मुंबईचा रहिवाशी आहे. जेसनचं शरीर म्हणजे चालता-फिरता जाहिरात फलक आहे. जेसनच्या शरिरावरील टॅटू हे वेगवेगळ्या ब्रॅण्डचे सिम्बॉल आहेत.

यामध्ये म्हाडापासून अॅलन सोलीपर्यंत, रिझर्व्ह बँकेपासून ते रॉयल एन्फिल्डपर्यंत आणि गुगलपासून ते पुमापर्यंत विविधी ब्रॅण्डचे लोगो टॅटूने रेखाटले आहेत. जेसनच्या शरिरावर जवळपास 380 लोगो आहेत.

Jason George

इतकंच नाही तर जेसनने त्याच्या गर्लफ्रेण्डचा चेहराही छातीवर टॅटूने गोंदला आहे.

“ब्रॅण्ड हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत,

म्हणूनच मी अंगभर टॅटूने रेखाटले आहेत.

ब्रण्डचा टॅटू रेखाटणं म्हणजे त्या-त्या ब्रॅण्डला धन्यवाद, थँक्स म्हणणं आहे”,

असं जेसन सांगतो.

जेसनला आता विक्रमाचे वेध लागले आहेत. सर्वाधिक ब्रॅण्डचे टॅटू गोंदण्याचा विक्रम करण्याचा त्याचा मानस आहे.

सध्या कोणाच्याही नावावर ब्रॅण्डच्या लोगोचा टॅटू शरिरावर काढण्याचा विक्रम नाही.

मी पहिला आणि एकमेव व्यक्ती आहे आणि मला याचा अभिमान आहे”,

असं जेसन म्हणतो.

जेसनने 380 पैकी 321 लोगोंचीच विक्रमासाठी नोंद केली आहे. 300 ही मोठी संख्या आणि 21 हा लकी नंबर असल्याची भावना जेसनची आहे.

जेसनने 2015 मध्ये एकाच महिन्यात 177 टॅटू गोंदण्याचा विक्रम रचला होता.

First Published: Thursday, 9 February 2017 1:05 PM

Related Stories

उन्हाळ्यात गोड पदार्थ खात असाल तर सावधान!
उन्हाळ्यात गोड पदार्थ खात असाल तर सावधान!

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सरबत किंवा गोड पदार्थांचं

ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर या गोष्टी सर्च करु नका!
ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर या गोष्टी सर्च करु नका!

मुंबई : ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर अनेक खाजगी गोष्टी सर्च केल्या जातात.

... म्हणून टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये
... म्हणून टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

मुंबई : टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा

मेक्सिकोतील एका महिलेची व्हेल माशासोबत मैत्री
मेक्सिकोतील एका महिलेची व्हेल माशासोबत मैत्री

मुंबई : मैत्रीला जसं वयाचं बंधन नसतं, तसंच व्यक्तीचंही बंधन नसतं.

जर तुम्ही लिक्विड सोपने हात धूत असाल तर सावधान!
जर तुम्ही लिक्विड सोपने हात धूत असाल तर सावधान!

मुंबई : ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही

सर्वात महागडा हिरा, पिंक स्टारची विक्रमी किंमतीत विक्री
सर्वात महागडा हिरा, पिंक स्टारची विक्रमी किंमतीत विक्री

हाँगकाँग : हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये एका दुर्मिळ प्रकारच्या

'नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी खेळा व्हिडिओ गेम'
'नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी खेळा व्हिडिओ गेम'

न्यूयॉर्क : सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकजण नैराश्येच्या गर्तेत

सुपरमार्केटमध्ये शॉपिंग बास्केट वापरताय?...सावधान !
सुपरमार्केटमध्ये शॉपिंग बास्केट वापरताय?...सावधान !

मुंबई : सुपरमार्केटचं जाळं आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये

रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?
रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?

 मुंबई: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग