ज्येष्ठ पत्रकार आणि पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसैन यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते.

ज्येष्ठ पत्रकार आणि पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसैन यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज संध्याकाळी 7.25 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील.

एक प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे पत्रकार म्हणून ते परिचयाचे होते. 2002 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

परभणीत झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचं ते अध्यक्ष होते.

याशिवाय, त्यांना महाराष्ट्र शासनासह, केंद्र शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले होते. 2014 मध्ये त्यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकाकिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.

इस्लाम व शाकाहार, मुस्लिम मानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: journalist padmshree mujaffar hussian pass away
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV