मायकल जॅक्सन ते जस्टिन बिबर, वादांची मालिका

By: | Last Updated: > Wednesday, 10 May 2017 12:13 PM
Justin Bieber and michael jackson india tour special report latest update

मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी. वाय.पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे.  यानिमित्तानं 1996 साली आलेल्या मायकेल जॅक्सनच्या दौऱ्याच्याही आठवणी ताज्या होत आहेत.

वयाच्या अवघ्या तेवीसीतच जस्टिन बीबर पॉप जगतातला तारा बनला. मात्र प्रसिद्धीबरोबरच वादांची मालिकाही त्याच्या पाठिमागे कायम राहिली.  सध्या जस्टिन बीबर चर्चेत आहे तो त्याच्या भारत दौऱ्यामुळे. मायकल जॅक्सननंतर आंतरष्ट्रीय पातळीवरचा एवढा मोठा स्टार जस्टिनच्या रुपानं भारतात येतोय.

michael jackson, Justin Bieber

म्हटलं जातंय की नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील मैदानावर होणारा जस्टिनचा शो एकाचवेळी 45 ते 50 हजार लोक पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमासाठी 25 पोलीस अधिकारी, 500 पोलीस, 1200 खासगी सुरक्षारक्षकांचा फौजफाटाही तयार आहे.

महत्वाचं म्हणजे जस्टिनच्या सुरक्षेचा ताफा अधिक चोख ठेवण्याची जबाबदारी सलमान खानचा बॉडिगार्ड शेरावर सोपवली गेली आहे.

जस्टिनचा शो पाहण्यासाठी तिकिटांचा दर हा 4 हजारापासून ते तब्बल 77 हजार रुपये इतका आहे. मात्र, तरीही जस्टिनचं फॅन फॉलोईंग पाहता हा शो हाऊसफूल होईल, असा अंदाज आहे.

जस्टिनच्या शोला ‘हॅरी पॉटर अँड द हाफ ब्लड’ या सिनेमात झळकलेली अभिनेत्री एरिलिका जॉनसन होस्ट  करणार आहे. एरिलिका जॉनसन स्वतःदेखील जस्टिन बीबर मोठी चाहती आहे.

raj Thackeray &  michael jackson

1996 साली अशाच एका बड्या कलाकाराचा शो चर्चेत आणि वादात राहिला होता. तो स्टार म्हणजे मायकेल जॅक्सन. ज्यावेळी मायकेल जॅक्सन भारतात आला. त्यावेळी जस्टिन बीबर अवघ्या 2 वर्षांचा होता.

मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता.  या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती.  आणि मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता.

Raj Thackeray, Sonali Bendre

मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते.  खास मराठमोळ्या पद्धतीनं झालेल्या स्वागतामुळे मायकेल जॅक्सन भारावल्याची दृश्यं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत.  विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटली. त्यानंतर भारताबद्दलच्या अनेक आठवणी मायकेल जॅक्सननं लिहून ठेवल्या होत्या.

या दोन स्टार्सची तुलना यासाठी की दोघंही नेहमी वादात राहिले. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे एका राजकीय पक्षाचा पुढाकार होता. म्हणून त्याकाळी प्रचंड टीकाही झाली. आता जस्टिननंही भारतात येण्यासाठी आयोजकांपुढे काही हास्यास्पद तर काही अशक्यप्राय अटी पुढे ठेवण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

संबंधित बातम्या

जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड

सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी

First Published:

Related Stories

दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु
दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु

मुंबई : नोटाबंदीनंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन

‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी
‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : प्रचंड कर्ज आणि दिवसेंदविस वाढत जाणारा तोटा यामुळे एअर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप