बिबरचा 'बेबी' यूट्यूबच्या इतिहासात डिसलाईक व्हिडीओत अव्वल!

बिबरचा 'बेबी' यूट्यूबच्या इतिहासात डिसलाईक व्हिडीओत अव्वल!

मुंबई: जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी. वाय.पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे. जस्टिन बिबर मध्यरात्री मुंबई विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. 

बेबी…बेबी… हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही.

जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांच्या जस्टिन बिबरने नामांकित ग्रॅमी अॅवॉर्ड मिळवला आहे.

ज्या बेबी गाण्यामुळे जस्टिन बिबर जगभरात प्रसिद्ध झाला, त्याच गाण्याची कहाणीही रंजक आहे.

जस्टिन बिबरची संपत्ती किती?

बेबी या गाण्याने जगाला वेड लावलं आहे. यूट्यूबवर तर हे गाण 160 कोटी 81 लाख वेळा पाहिलं आहे. दिवसेंदिवस या गाण्याचे व्ह्यूव्ज वाढतच आहे.

असं असलं तरी, यू ट्यूबच्या इतिहासातील सर्वाधिक डिसलाईक व्हिडीओ म्हणून हेच बेबी गाणं पहिल्या क्रमांकावर आहे.

या व्हिडीओला लाईक्स पेक्षा डिसलाईकच जास्त आहे. लाईक्सचा आकडा 64 लाखाच्या घरात आहे. तर डिसलाईकचा आकडा हा 76 लाख 50 हजारांपेक्षा जास्त आहे.

Justin Bieber You tube song

यू ट्यूबवरील JustinBieberVEVO  या चॅनेलवर हा व्हिडीओ 19 फेब्रुवारी 2010 रोजी अपलोड केला आहे.  तेव्हापासून हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मात्र त्याचबरोबर लाईक्स आणि डिसलाईक अर्थात आवड आणि नावडल्याची संख्याही वाढत आहे.

बेबी गाण्याच्या लाईक्स आणि डिसलाईकच्या शर्यतीत पहिल्यापासूनच डिसलाईक्सने आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या


जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड


सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!


2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी 


जस्टिन बिबरची संपत्ती किती?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV