लग्नातल्या आहेराच्या पाकिटांवर डल्ला मारणारा गजाआड

लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगमध्येही स्टेजवर घुटमळताना हा चोरटा कैद झाला होता.

लग्नातल्या आहेराच्या पाकिटांवर डल्ला मारणारा गजाआड

कल्याण : एखाद्या लग्नात जाऊन सराईतपणे स्टेजवर असलेली आहेराची पाकिटं चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखा आणि खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम अबरार खान असं आरोपीचं नाव असून तो अवघ्या 19 वर्षांचा आहे. सद्दाम अबरार खान भिवंडीचा राहणारा आहे.

डिसेंबर महिन्यात कल्याणच्या वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रजापती कुटुंबीयांचा लग्नसोहळा सुरु होता. यावेळी वधू-वराला मिळालेल्या भेटवस्तू आणि आहेराची पाकिटं अज्ञात चोरट्याने लांबवल्याचं समोर आलं होतं. लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगमध्येही स्टेजवर घुटमळताना हा चोरटा कैद झाला होता.

Marriage_Theft_1
याप्रकरणी प्रजापती यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिस आणि गुन्हे शाखेने कल्याण परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या आणखी घटनांचे व्हिडीओ तपासले. त्यात एकच चोरटा सगळीकडे दिसून आल्याने त्याचा शोध घेऊन भिवंडीच्या कन्हेरीतून त्याला अटक करण्यात आली.

त्याचं नाव सद्दाम अबरार खान असल्याचं समोर आलं असून त्याने चोरीची कबुलीही दिली आहे. जवळपास दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल त्याने चोरल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kalyan : 19 year old youth arrested for looting money at marriage
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV