कल्याणमध्ये बॅनर लावण्यावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविका भिडल्या!

कल्याण पूर्वेत शीतल मंढारी आणि माधुरी काळे या प्रभाग 98 आणि 99 च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

कल्याणमध्ये बॅनर लावण्यावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविका भिडल्या!

कल्याण : बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाल्याची घटना रविवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याण पूर्वेत शीतल मंढारी आणि माधुरी काळे या प्रभाग 98 आणि 99 च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यात काळे यांनी मंढारी यांच्या प्रभागात मागच्या टर्ममध्ये झालेल्या कामाचा बॅनर एका सोसायटीने लावल्याने या दोघींमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.

Kalyan_Corporator_Fight_2

हा वाद पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी रात्री उशिरा माधुरी काळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा, तर मंढारी आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV