कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक

35 वर्षीय केविन केणी बावा आणि 34 वर्षीय लिसबन स्टेनील लोपेज यांच्यावर कारवाई करण्यात आली

कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक

मुंबई : मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊण्ड मध्ये लागलेल्या आग प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 'वन अबव्ह' या हॉटेलच्या दोन मॅनेजरना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 35 वर्षीय केविन केणी बावा आणि 34 वर्षीय लिसबन स्टेनील लोपेज यांच्यावर कारवाई करण्यात आली. इतर आरोपींचा शोध अद्यापही सुरुच आहे.

कालच '1 अबव्ह'चे मालक जिगर आणि कृपेश संघवी यांच्या काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी काकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला.

कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा


आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत.

अग्नितांडवात 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील अनेक हॉटेलांच्या अनधिकृत बांधाकामांवर तोडकामाची कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं

1 Above पबला गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला, तर इतरही अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

पाच अधिकाऱ्यांवर कारवाई

कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. कमला मिल्सच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे

मुंबई-जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे.

निलंबित अधिकारी

मधुकर शेलार, पदनिर्देशित अधिकारी
धनराज शिंदे, ज्युनिअर इंजिनियर
महाले, सब इंजिनिअर
पडगिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
एस. एस. शिंदे, अग्निशमन अधिकारी

सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार

सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी 1 Above हॉटेलची सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने इथे तपासणी करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये अवैधपणे हॉटेल बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू

आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1 Above हॉटेलमालक कृपेश संघवी यांना जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये हॉटेलचा अनधिकृत भाग सात दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही हॉटेल अवैधरित्या चालूच होतं.

संबंधित बातम्या


कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस


बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार


अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई


1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान


हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री


कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित


भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील


कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!


कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!


कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'


कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...


कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली


मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू


मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kamla Mills Compound Fire : Managers of 1 above hotel arrested by Mumbai Police latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV