माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या

माफियागिरीतून आलेल्या पैशांच्या जोरावरच शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या

मुंबई : माफियागिरीतून आलेल्या पैशांच्या जोरावरच शिवसेनेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक फोडले, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या फोडाफोडीनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.

भांडुपमधला पराभव शिवसेना पचवू शकली नाही, म्हणूनच शिवसेनेनं फोडाफोडीचं राजकारण सुरु केला असल्याचा, दावाही सोमय्यांनी केला आहे. तसेच ज्या भांडुपमध्ये कोकणवासिय मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत, त्याच वॉर्डात शिवसेनेची पिछेहाट होत आहे. यावरुन मुंबईकर आणि कोकणवासिय भाजपच्या सोबत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

तसेच भाजपने कोणताही उमेदवार आयात केला नाही. उलट भांडुपमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचे वडील शिवसेनेचे नगरसेवक आहेत. ते संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या सुनेला राजकारणात यायची इच्छा होती. आम्ही फक्त त्यांचं स्वागत केलं, असं सांगून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं.

तसेच महापालिका वांद्र्याच्या सुप्रीमोंच्या हातातून जाण्याची भिती वाटत असल्यानं खरेदी विक्री महासंघाचं नेतृत्व सुरु केला असल्याचा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला.

काय म्हणाले किरीट सोमय्या?संबंधित बातम्या

घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!

फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: BJP Vs Sivsena kirit somayya udhav thackeray
First Published:

Related Stories

LiveTV