कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 24 डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडाण योजनेअतंर्गत सुरु होणाऱ्या विमानसेवेमध्ये कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचाही समावेश आहे. ही विमानसेवा येत्या 24 डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन या विमानसेवेचं वेळापत्रकही शेअर केलं आहे.

संभाजीराजेंनी दिलेल्या माहितीनुसार,

 • कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरु होईल.

 • दर मंगळवार, बुधवार, रविवार अशी ही विमानसेवा असेल

 • मुंबई ते कोल्हापूर दुपारी १:१५ वाजता विमान असेल, ते दुपारी 2.30 वा. कोल्हापूरला पोहोचेल.

 • त्याच दिवशी कोल्हापूर ते मुंबई दुपारी ३:२५ वाजता : मुंबईकडे निघेल, मग ते विमान दुपारी ४:४० वाजता मुंबईत पोहोचेल.


उडान योजनेनुसार अवघ्या अडीच हजारात विमानप्रवास करता येईल. मात्र विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीटसाठीच ही योजना लागू असेल.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/940894855898828801

चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उडान योजनेचे मार्ग जाहीर झाल्यानंतर, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसात सुरु होईल, अशी घोषणा 4 एप्रिल 2017 रोजी केली होती.  मात्र ही विमानसेवा आजपर्यंत सुरुच झालेली नाही.

कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरु होणं प्रस्तावित आहे, मात्र आता ती दहा दिवसातच सुरु होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

उडाणच्या नियम व अटी

या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल.

म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल.

महाराष्ट्रातील हवाई मार्ग

 • नांदेड- मुंबई –  (जून- 2017)

 • नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)

 • नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)

 • कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)

 • सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017) 


संबंधित बातम्या

स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात  


कोल्हापूर - मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात!

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला केंद्राचा हिरवा कंदील

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kolhapur-Mumbai flight udan service to start from 24 december 2017 : sambhajiraje
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV