कोंढाणे धरण घोटाळा: आरोपपत्र दाखल, मात्र तटकरेंचं नाव नाही!

लाचलुचपत विभागाने 3 हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.

कोंढाणे धरण घोटाळा: आरोपपत्र दाखल, मात्र तटकरेंचं नाव नाही!

मुंबई: रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण घोटाळाप्रकरणी लाचलुचपत विभागाने ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. महत्त्वाचं म्हणजे या आरोपपत्रात तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचं नाव नाही.

सुनील तटकरे यांचं आरोपपत्रात नाव नसलं, तरी त्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या आरोपपत्रात केली आहे.

लाचलुचपत विभागाने 3 हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.

सुनील तटकरेंचा या घोटाळ्यात सहभाग होता का, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहे. त्यामुळे त्यांना सध्या आरोपी करण्यात आलेलं नाही.

या आरोपींची नावे चार्टशीटमध्ये दाखल

  • एफ ए कंस्ट्रक्शनचे, निसार फतेह खत्री

  • कोकण पाटबंधरे विकास विभागचे

  • देवेंद्र शिर्के, तत्कालीन संचालक

  • बी बी पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता

  • पी बी सोनावणे, तत्कालीन मुख्य अभियंता

  • आर डी शिंदे, तत्कालीन अधीक्षक अभियंता

  • ए पी कालूखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता

  • राजेश रीठे, तत्कालीन कार्यकारी अभियंता


आरोपींना जामीन मंजूर

कोंढाणे धरण घोटाळ्यातील सातही आरोपींना 25 हजारांचा जामीन मंजूर झाला आहे. जेव्हा अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा हजर रहाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.

काय आहे कोंढाणे धरण घोटाळा?

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ कोंढाणे धरण प्रकल्प बांधण्यात आलं आहे. सुनील तटकरे हे जलसंपदा मंत्री होते, तेव्हा या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. प्रकल्प बांधतानाची मूळ किंमत 80 कोटी होती. त्यात वाढ होऊन ती 327 कोटीपर्यंत पोहचली. विशेष म्हणजे प्रकल्पाची किंमत कितीतरी पटीनं वाढवताना कुठल्याही विभागाची परवानगी घेतली नाही. याशिवाय प्रकल्प बांधताना नियमांची पूर्तात केली नसल्याचाही आरोप आहे.

एबीपी माझानं हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं.

संबंधित बातम्या

कोंडाणे धरणाच्या भ्रष्टाचाराची सुरस कथा


वादग्रस्त कोंडाणे धरणाचं कंत्राट अखेर रद्द


कोंढाणेप्रकरणी तिसरी FIR, तटकरे पहिल्यांदाच चौकशीच्या घेऱ्यात 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV