कोपर्डी: 'छकुलीचे लचके तोडणाऱ्यांचेही तसेच लचके तोडा'

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत.

कोपर्डी: 'छकुलीचे लचके तोडणाऱ्यांचेही तसेच लचके तोडा'

मुंबई: माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगरच्या निर्भयाच्या आईने व्यक्त केली.

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. आता येत्या 22 नोव्हेंबरला आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल.

निर्भयाच्या कुटुंबियांची मागणी

दरम्यान आजच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या आईने उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

“उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री, मराठी समाज यासह मी सर्वांची आभारी आहे. माझ्या छकुलीला सर्वांनी साथ दिली. आता माझी एव्हढीच अपेक्षा आहे, 22 तारखेला जो न्याय होईल, तो फाशीचाच झाला पाहिजे. माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा”, असं निर्भयाची आई म्हणाली.

या निकालासाठी आम्ही खूप वाट पाहिली, या नराधमांना जन्मठेप नको तर फाशीच द्या, समजाला दाखवा, त्याशिवाय अशा नराधमांवर जरब बसणार नाही. दुसऱ्या कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी यांना फाशी देणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या.

कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा

खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम 

कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kopardi Rape And Murder Case: Ahmednagar: Kopardi rape victim parents happy with court decision
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV