कुर्ल्यातील शितल सिनेमागृहाच्या इमारतीच्या पिलरशी छेडछाड

कुर्ल्यातल्या शितल सिनेमागृहाच्या पिलरशी छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. पण, महापालिकेने यावर इमारत मालकाला नोटीस पाठवण्याच्या व्यतिरित्त कोणतीही कारवाई केली नाही.

Kurla’s Shital Cinema Theater building more dangerous but BMC issue notice only

मुंबई : घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेला ज्याप्रमाणे पिलरशी केलेली छेडछाड कारणीभूत ठरली, तसाच प्रकार आता कुर्ल्यातल्या शितल सिनेमागृहात घडलाय. इथेही इमारतीच्या पिलरशी छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. पण, महापालिकेने यावर इमारत मालकाला नोटीस पाठवण्याच्या व्यतिरित्त कोणतीही कारवाई केली नाही.

कुर्ल्यातील भर गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या शितल सिनेमागृहाच्या इमारतीच्या पिलरशी छेडछाड करण्यात आली आहे. यामुळे ही इमारत अधिकच धोकादायक बनली असून, या इमारतीचा काही भागही कोसळला आहे.

विशेष म्हणजे, या इमारतीच्या खाली शितल बार आणि रेस्टॉरंटही सुरु आहे. या इमारतीची तपासणी करुन महापालिकेनं हे सिनेमागृह तात्काळ बंद तर केलंय. मात्र भर गर्दीच्या रस्त्यावर असणारी ही इमारत आजुबाजूच्या नागरिकांसाठी धोरादायक ठरु शकते.

दरम्यान, या इमारतीच्या शेजारी छत्रपती शिवाजी तलाव आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दीही होते. त्यामुळे या इमारतीवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक असताना, केवळ नोटीस बजावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. ”शितल सिनेमागृहाची इमारत तत्काळ जमीनदोस्त करण्याची आवश्यक्ता असताना, मुंबई महापालिका नोटीस बजावून आपले हात झटकत आहे. जर या परिसरातही घटकोपर सारखी दुर्घटना घडल्यास, याची जबाबदारी कुणाची,” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kurla’s Shital Cinema Theater building more dangerous but BMC issue notice only
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत

मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे

फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे

मिरा भाईंदर : आम्ही फोडाफोडी केलेली नाही, लोक विश्वासाने आले आहेत,

मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे.

विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार
विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री

मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण
मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे

327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद
327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद

नवी मुंबई: तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे

मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप
मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप

मिरा भाईंदर : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली

अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं
अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं

मुंबई : नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे

झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले
झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले

मुंबई: उत्तर भारतातील केस कापण्याच्या घटनांचं लोण आता मुंबईतही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास

मुंबई: येत्या 20 ऑगस्ट रोजी मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुका होत