दोन मुलांना इमारतीतून फेकून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या

दोन मुलांना इमारतीतून फेकून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या

ठाणे : पतीसोबत वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्याजवळच्या मुंब्रा परिसरात समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन आपल्या दोन्ही मुलांना खाली फेकून विवाहितेने आत्महत्या केली.

या घटनेत पाच वर्षांचा तौसिफ हा मुलगा बचावला असून चार वर्षांच्या अमरीनसह 27 वर्षीय शिरीन खान यांचा जागीच मृत्यू झाला. पतीसोबत वारंवार होणाऱ्या भांडणाच्या कटकटीला कंटाळून शिरीन यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरीन घर पाहण्यासाठी मुंब्य्रातील शिबलीनगरमधल्या एमएमआरडीएच्या दोस्ती अपार्टमेंटमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी रागाच्या भरात त्यांनी इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन मुला-मुलीला खाली फेकून स्वतः उडी मारली.

पाच वर्षांचा तौसिफ मुलगा या घटनेत वाचला असून त्याच्या हातापायांना फ्रॅक्चर झालं आहे. त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शिरीन यांच्यासह अमरीन या मुलीचा जागीच मृत्यू झाला. डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV