'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

एबीपी माझाच्या दोन बातम्यांनी दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

'माझा'च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

मुंबई : समृद्धी महामार्गचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप एबीपी माझाने दाखवल्यानंतर आज विधानसभा आणि विधानपरिषदेत त्याचे पडसाद उमटले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर मोपलवारांचं तातडीनं निलंबन करा अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. याशिवाय गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सत्ताधाऱ्यांचा सभात्याग


खरं तर सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाहीत, असं आपण पाहिलं होतं. पण इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांवर विरोधक भारी पडल्याचं दिसतं आहे. कारण विरोधक बोलू देत नाहीत. असा आरोप करत चक्क विधानपरिषदेतून सत्ताधाऱ्यांनीच सभात्याग केला.

आज राधेश्याम मोपलवार आणि प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि दोघांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नाही. अशी भूमिका घेतली. याशिवाय सभागृहाबाहेर पळपुट्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही केली. यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. आणि त्यांनी सभात्याग केला.

धनंजय मुंडे यांची सरकारवर टीका 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावरुन सरकारवर जोरदार टीका केली. ‘सत्ताधाऱ्यांनी सभात्याग करणं हे आजवर पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. मंत्र्यांवरील आरोपावर आम्ही उत्तराची मागणी केली पण आरोपावर उत्तर देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केला.’ असं धनंजय मुंडे

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचं उत्तरं  

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या या टीकेवर महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी  उत्तर दिलं. ‘विधानपरिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस संख्याबळ जास्त असल्यानं कामकाज होऊ देत नाही. विधानपरिषद हे ज्येष्ठांचं सभागृह असून इथं कायदे तयार होत असतात. असं असूनही विरोधक मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत होते. त्यामुळेच आम्ही सभात्याग केला.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दुसरीकडे मोपलवार यांचं निलंबन आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसनं विधानसभेतून सभात्याग केला. आता मेहता आणि मोपलवारांवर कारवाई टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी हा कांगावा तर केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

संबंधित बातम्या :

मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

मुख्यमंत्र्यांना न सांगताच 'अवगत' शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची 'समृद्धी'?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV