अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत बिबट्या घुसला

पश्चिम उपनगरातील अंधेरीत शेर ए पंजाब कॉलनीमध्ये आज रविवारी दुपारी बिबट्या घुसला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. हा बिबट्या एका रिकाम्या क्लासमध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत बिबट्या घुसला

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरीत शेर ए पंजाब कॉलनीमध्ये आज रविवारी दुपारी बिबट्या घुसला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. हा बिबट्या एका रिकाम्या क्लासमध्ये घुसल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज रविवारी अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीतील एका रिकाम्या क्लासमध्ये बिबट्या घुसला. या क्लासमध्ये लहान मुलांची शिकवणी घेतली जाते. आज रविवार असल्यानं हा क्लास रिकामा होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान काहीवेळापूर्वी मुंबई पोलिस आणि वन विभागाची टीम दाखल झाली आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. मुंबईतील भरवस्तीत बिबट्या आल्यानं काहीकाळ या भागात घबराट आणि बघ्यांची गर्दीही होती. आरे कॉलनी शेर ए पंजाब कॉलनी जवळ असल्यानं हा बिबट्या तिकडून आल्याची शक्यता आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: leopard found in sher e colony andheri east in mumbai latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV