कर्जमाफीसाठी राज्यभरातून 77 लाख अर्ज

राज्य सरकारने 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले.

कर्जमाफीसाठी राज्यभरातून 77 लाख अर्ज

मुंबई: राज्य सरकारकडे कर्जमाफीसाठी आतापर्यंत 77 लाख 26 हजार अर्ज आले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. जवळपास 56 लाख शेतकरी कुटुंबांनी हे अर्ज केले आहेत.

राज्य सरकारने 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले.

दरम्यान कर्जमाफीसाठी 77 लाख अर्ज आले असले, तरी अजून 2 लाख 41 हजार 428 शेतकऱ्यांनी अद्याप आधार नंबर दिलेला नाही.

मात्र ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांनी पडताळणीसाठी तात्पुरतं आधार नोंदणी नंबर पुरवावा, असं आवाहन सहकार विभागाने केलं आहे.

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना या अंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक होतं.

दरम्यान, कर्जमाफीबाबत आढावा घेण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली.

संबंधित बातम्या

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमाफी : खा. आनंदराव अडसूळ
महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी


2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री
कर्जमाफी 34 हजार कोटींची, जाहिरातबाजी 36 लाखांची!


कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेशशेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV