एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश मेहतांवर लोकायुक्तांचे ताशेरे

एमपी मिल कंपाऊंडसह मुंबईतील एसआरए प्रकल्पांना प्रकाश मेहता यांनी दिलेल्या मंजुऱ्या वादग्रस्त ठरल्या आहेत. यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.

एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश मेहतांवर लोकायुक्तांचे ताशेरे

मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कारभारावर लोकयुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांनी दिलेली नियमबाह्य परवानगी नाकारता आली असती असं निरीक्षण लोकायुक्तांनी त्यांच्या प्रथमदर्शनी अहवालात नोंदवलं आहे.

अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले का, याचा तपास व्ह्यायला हवा असं मतही लोकयुक्तांनी व्यक्त केलं. यासंबंधी प्रकाश मेहतांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 6 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

एमपी मिल कंपाऊंडसह मुंबईतील एसआरए प्रकल्पांना प्रकाश मेहता यांनी दिलेल्या मंजुऱ्या वादग्रस्त ठरल्या आहेत. यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप  विरोधी पक्षाने केला होता.

काय आहेत प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप?

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

संबंधित बातम्या :


एमपी मिल प्रकरणात मुख्यमंत्री चौकशीला सामोरे जाणार : सूत्र


प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

‘माझा’च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Lokayukta criticizes Prakash mehta in Mumbai SRA project latest udpates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV