नवी मुंबईत व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, 2 कोटींचा ऐवज लुटला

6 दरोडेखोर कुरीअर एजंटचं सोंग घेऊन घरात शिरले आणि त्यांनी व्यापारी मेनकुदळे आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून घरातली रक्कम आणि दागिने लुटले

नवी मुंबईत व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, 2 कोटींचा ऐवज लुटला

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या एपीएमसीचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटींचा ऐवज लुटला.

रात्री 9च्या सुमारास 6 दरोडेखोर कुरीअर एजंटचं सोंग घेऊन घरात शिरले आणि त्यांनी मेनकुदळे आणि त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून घरातली रक्कम आणि दागिने लुटून नेले.

दरोडेखोरांच्या टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समजतं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Looted two crores in Navi Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV