फेरीवाला आंदोलन : मनसे कार्यकर्त्याकडे जामिनासाठी 1 कोटींच्या हमीची विचारणा

21 ऑक्टोबरला मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील फेरीवाल्यांना हुसकावून लावलं. त्याप्रकरणी मनसे कार्यकर्ता अविनाश जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला.

फेरीवाला आंदोलन : मनसे कार्यकर्त्याकडे जामिनासाठी 1 कोटींच्या हमीची विचारणा

ठाणे : फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यावर चॅप्टर केस दाखल करण्यात आली असून जामिनासाठी तब्बल 1 कोटींची हमी मागण्यात आली आहे. अविनाश जाधव असं कोर्टानं नोटीस बजावलेल्या मनसे कार्यकर्त्यांच नाव आहे.

21 ऑक्टोबरला मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील फेरीवाल्यांना हुसकावून लावलं. त्याप्रकरणी मनसे कार्यकर्ता अविनाश जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला.  दंडाधिकारी कार्यालयाने त्याला पाठवलेल्या नोटिशीत 1 कोटींच्या जामिनाची विचारणा करण्यात आली आहे.

ठाण्यातील नौपाडा विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभय सायगांवकर यांनी अविनाश जाधव यांना जामिनासाठी 1 कोटींची हमी मागवून, सात दिवसात नोटिशीचे उत्तर मागितले आहे.

आता या नोटिशीनंतर मनसेची काय भूमिका असेल, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

फेरीवाल्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

एलफिन्स्टन घटनेनंतर अवैध फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली.

मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंना फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आणि त्यानंतर फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाने आणखी मोठं रुप घेतलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: magistrate ask for 1 crore for bell from MNS worker latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: MNS thane ठाणे मनसे
First Published:
LiveTV