राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल

राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल

मुंबई: मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काय आहे प्रकरण?

सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

DOCTOR PROTEST sion hospital

या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.

आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय? 

  • डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० ची परिणामकारक अंमलबजावणी करा  • डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी  • निवासी डॉक्टरांना सुरक्षीत वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा  • सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा.


 

औरंगाबादमध्येही डॉक्टरला मारहाण 

तिकडे औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टर मारहाणप्रकरणी निवासी डॉक्टरांनी रूग्णसेवा बंद केली.  रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. या निषेधार्थ रूग्णालयातील रूग्ण सेवा बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण


औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण


धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे


इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या त्याडॉक्टरची हतबलता


धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास


धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV