कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी 'आपले सरकार' या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दररोज 2 ते 5  लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार या वेबसाईटवर जाहीर केली आहे.

शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा

  • aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करा

  • इथे वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला शक्य तो निवडा

  • जर इंग्रजी सिलेक्ट केला तर डाव्या बाजूला, Chatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana - Year 2017  हे दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • जर मराठी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - वर्ष २०१७ हे दिसेल त्यावर क्लिक करा.

  • उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडायचं आहे.


शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV