मुंबईतील वांद्र्यात राज्यातील पहिलं मराठी अभिमत विद्यापीठ

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला आणि हॉटेल ताज या वास्तूंच्या मधल्या जागेत मराठी अभिमत विद्यापीठ तयार होणार आहे

मुंबईतील वांद्र्यात राज्यातील पहिलं मराठी अभिमत विद्यापीठ

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागात राज्यातलं पहिलं मराठी अभिमत विद्यापीठ स्थापन होणार आहे. उद्या (मंगळवारी) मराठी राजभाषा दिनाच्या मुहूर्तावर विद्यापीठासाठीच्या जागेचं हस्तांतरण होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला आणि हॉटेल ताज या वास्तूंच्या मधल्या जागेत मराठी अभिमत विद्यापीठ तयार होणार आहे. या जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला विधानभवनात होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेत ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभं राहणार आहे. अन्य राज्यांमध्ये त्या-त्या भाषांची विद्यापीठं आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंदी विद्यापीठ आहे, मात्र आजपर्यंत मराठी भाषेचं विद्यापीठ नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

हे अभिमत विद्यापीठ ग्रंथाली वाचक चळवळीने पुढाकार घेऊन हे स्थापन करायचं ठरवलं. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज अर्थात कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Maharashtra’s first Marathi university in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV