भिवंडीत अग्नितांडव, तब्बल 15 गोडाऊन जळून खाक

भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरातील सरदार कंपाऊंड इथल्या भंगार गोदामाला लागलेल्या आगीत तब्बल 15 ते 16 गोडाऊन जळून खाक झाले आहेत.

भिवंडीत अग्नितांडव, तब्बल 15 गोडाऊन जळून खाक

भिवंडी : भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरातील सरदार कंपाऊंड इथल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. काल (मंगळवार) रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती. अद्यापही पूर्णपणे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही.

या आगीमध्ये 15 ते 16 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे. मात्र, आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या गोदामांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने ही आग तिथे पसरु नये यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

घटनास्थळी भिवंडी,कल्याण व उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही आग अटोक्यात आलेली नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Major fire in Bhiwandi, the huge loss of 15 godowns latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV