ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट

ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपतींशी त्या चर्चा करत आहेत.

ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई: मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली.

सध्या ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपतींशी त्या चर्चा करत आहेत.

या बैठकांमधून वेळ काढून ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. नोटाबंदीच्या काळात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावेळी या दोघांची फोनवरुन चर्चाही झाली होती.

शिवाय सध्या गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून देशभरात मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनाही मोदींविरोधात आवाज उठवत आहे. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mamata Banerjee Meet Uddhav Thackeray
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV